मुंबई : कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्याने सर्व स्तरातून कंगनावर टीका होत आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगना सतत आपल्या वक्तव्याच्या फैरी झाडत आहे. यानंतर तिला मुंबई पोलिसांची सुरक्षा कंगनाने नाकारली आणि मुंबई पोलिसांपासूनच आपल्याला जास्त भिती वाटते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या प्रकरणात कंगनाला सुनावलं होतं, तर मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये. यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे, असा सवाल कंगनाने केल्यानंतर तिच्यावर चौफेर टीका होत आहे.



यावर चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी टवीट करून म्हटलं आहे, 'या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus


संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कंगना म्हणाली...
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.