मुंबई : देशात सध्या अग्निपथ योजनेवरून (agnipath scheme) अग्नितांडव सुरु आहे. बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र यांसह अनेक राज्यात अग्निपथ योजने विरोधात घोषणाबाजी जाळपोळ सुरु आहे. त्यामुळे या योजनेवरून देशात मोठा वाद सुरू झालाय. या वादावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिलीय. (Kangana Ranaut supported agnipath scheme compare with old gurukul) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्राम स्टोरीत काय? 
कंगना राणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.या स्टोरीत तिने अग्निपथ योजनेवर आपली प्रतिक्रिया दिलीय. कंगनाने स्टोरीवर लिहिले की, 'इस्रायलसारख्या अनेक देशांनी तरुणांसाठी सैन्य प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. तेथील प्रत्येकजण सैन्याच्या शिस्तीसाठी आणि राष्ट्रवादासारखी मूल्ये शिकण्यासाठी काही वर्षे घालवतो. #agnipathscheme ही केवळ करियर बनवणे, रोजगार मिळवणे किंवा पैसे कमवणे इतकीच नसल्याचे ती म्हणते. 


 कंगनाने, 'अग्निपथ योजने'ची तुलना प्राचीन काळातील गुरुकुलाशी केली आहे. कंगनाने लिहिले, 'जुन्या काळी सर्वजण गुरुकुलमध्ये जात असत. हे तसेच आहे, फक्त त्यांना पैसे मिळत आहेत. ड्रग्ज आणि PUBG मुळे उद्ध्वस्त होत चाललेली तरुणाईला याची गरज आहे. या योजनेसाठी सरकारचे कौतुक केले पाहिजे,अस ती म्हणतेय.