Kangana Ranaut on Bollywood Parties : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एमरजेंसी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक सुरु आहे. कंगनासध्या तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानिमित्तानं कंगनानं राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना कंगनानं बॉलिवूडच्या पार्टीजवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाला विचारण्यात आलं की इंडस्ट्रीमध्ये तिचे कोणी मित्र आहेत? यावर त्यांनी सांगितलं की हे बघा मी बॉलिवूड टाईपची व्यक्ती नाही. मी बॉलिवूडमधील लोकांची मैत्रिण नाही होऊ शकत. बॉलिवूडचे लोक स्वत: चा विचार करणारे आहेत. ते मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही. त्यांचं आयुष्य हे प्रोटीन शेकच्या आजुबाजूला फिरतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे कंगनानं सांगितलं की 'ते लोक जर शूटिंग करत नसतील तर त्यांचे रुटीन असतं की सकाळी उठायचं, काही फिजिकल ट्रेनिंग करतात. दुपारी झोपतात आणि मग उठून जिमला जातात. त्यानंतर परत झोपतात आणि टिव्ही बघतात. नाकतोड्यासारखे आहेत ते. वाईट वृत्तीचे. तुम्ही अशा लोकांचे मित्र कसे होऊ शकतात? त्यांना काही आयड्या नाही की काय सुरु आहे. त्यांचं काहीच बोलणं होत नाही. ते भेटतात, मद्यपान करतात आणि कपडे-दागिन्यांच्या गोष्टी करतात. बॉलिवूडमध्ये डिसेंट व्यक्ती भेटली जी गाडीवगैरेच्या गोष्टी सोडून दुसरं काही बोलेल,  तर मला आश्चर्य होईल.'


बॉलिवूड पार्टीविषयी कंगना म्हणाली, 'हे लाजिरवाणी गोष्ट आहे. ते लोक ज्या गोष्टी बोलतात, ते ट्रॉमा असतं. बॉलिवूड पार्टी माझ्यासाठी ट्रॉमासारख्या असतात.' 


हेही वाचा : 'मैंने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये होणार रिलीज! 35 वर्षांनंतर पुन्हा सलमानची जादू अनुभवण्याची संधी


कंगनाविषयी बोलायचं झालं तर ती पॉलिटिकल करियरवर लक्ष देत आहे. ती बॉलिवूडमध्ये जास्त काम करत नाहीये. आता तिचा एमरजेंसी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर या आधी तिचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात ती तेजस गिलच्या भूमिकेत दिसली होती. आता ती एमरजेंसीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिनं दिग्दर्शन केलं असून त्यासोबत ती या चित्रपटाची निर्माती देखील केली आहे.