मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या ट्विटमुळे वारंवार चर्चेत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप केला. कंगनाने यामध्ये काही कलाकारांची उघडपणे नावंही घेतली. आता कंगनाने बॉलीवूड अभिनेत्यांना ड्रग्ज टेस्ट करून  घेण्याचं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्टसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने द्यावेत, अशी मी विनंती करते. या लोकांना कोकेनचं व्यसन असल्याची अफवा आहे. त्यांनी या अफवांचा भांडाफोड केला पाहिजे. त्यांच्या नमुन्यांमध्ये काहीच निघाललं नाही, तर ते देशातल्या अनेक तरुणांना प्रोत्साहित करतील', असं ट्विट कंगनाने केलं आहे. याचसोबत तिने पंतप्रधान कार्यालयालाही या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.



याआधी कंगनाने करण जोहर याच्यावरही मुव्ही माफिया असल्याचा आरोप केला होता. करण जोहर मुव्ही माफियांच्यामधला मुख्य दोषी आहे. अनेक लोकांचं आयुष्य उद्धवस्त केल्यानंतर तो मुक्त फिरत आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. इकडे आमच्यासारख्या लोकांना काही अपेक्षा आहेत का? असं कंगना म्हणाली होती.