Kangana Ranaut tells Red Flags In Men : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की पुरुषांमधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही स्त्रीसाठी योग्य नाहीत. त्यावर कंगनानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कंगना रणौतनं सांगितलं की कोणत्याही रिलेशनशिपमध्ये हे खूप गरजेचं आहे की संतुलन हे दोन्ही बाजूनं असायला हवं. तर पुढे म्हणाली की जर महिलांनी त्याग करणं सोडलं तर कोणतंही नातं टिकणार नाही. कंगना रणौतनं सांगितलं की पुरुषांना अशा महिला आवडत नाही ज्या त्यांच्याहून हुशार आणि टॅलेंटेड आणि यशस्वी असतात. पण त्यासोबत तिनं हे देखील सांगितलं की महिलांना देखील त्यांच्यापेक्षा कमी यशस्वी आणि कमी हुशार पुरुष आवडत नाही. आता कोणत्या प्रकारचे पुरुष हे महिलांसाठी योग्य नसतात. या प्रश्नावर कंगनानं काय उत्तर दिलं ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौतनं सांगितलं की 'जर तुम्ही प्रत्येकवेळी नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हे करु नका. मग अशात समोरची व्यक्ती ही 40 टक्के करत असेल आणि तुम्ही 60 टक्के करत असाल तर हे कधीच योग्य रित्या चालू शकणार नाही. जर तुम्ही प्रामाणिक, सतर्क आणि निष्ठावान असाल तर संतुलन साधता येणार नाही.' 


पुढे कंगनाला विचारण्यात आलं की 'पण हे तर कायम राहणार कधी अस होऊ शकतं ती कधी मी माझं 80 टक्के देतोय तर  कधी ती 90 टक्के देण्याचा प्रयत्न करेल. त्यावर कंगना म्हणाली, 'माझ्या दिसण्यात तर असं कधी झालं नाही.'


पुढे कंगना म्हणाली, 'मुलींसाठी दुसरा रेड फ्लॅग हा आहे की ज्यावर त्या विश्वासही ठेऊ शकणार नाही. पण हे सत्य आहे की काही फरक पडत नाही की तुम्ही किती स्मार्ट अर्थात हुशार आहात. किती यशस्वी आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पुरुषाला अशी मुलगी नाही आवडणार, जी त्याच्याहून जास्त यशस्वी आणि टॅलेंडेट आहे. रिलेशनशिपमध्ये गोष्टी अशा प्रकारे असतात. कंगनानं सांगितलं की तिच्या केसमध्ये नाही पण तिनं इतर लोकांची उदाहरणं पाहिली आहेत. पण त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी मुली आवडत नाहीत.' 


हेही वाचा : Chhava Teaser : 'शिवा गया लेकिन...', हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही


कंगना याविषयी बोलताना म्हणाली की 'लग्न हे त्यामुळे टिकतं कारण महिला अनेक गोष्टींचा त्याग करतात. पुढे जेव्हा कंगना रणौतला विचारण्यात आलं की पुरुष जर महिलांपेक्षा जास्त हुशार नसतील तर त्या त्यांना पसंत करत नाहीत का? यावर कंगना रणौतनं उत्तर दिलं की अशा प्रकारचा पुरुष मित्र असू शकतो पण त्यांचा पार्टनर नाही होऊ शकत. एका पुरुषाला त्याला मिळणारा आदर मिळवण्यासाठी महिलेच्या पुढे असणं गरजेचं असतं. त्यामुळेच जर नात्यात कोणी खूप पटपट पुढे जात असेल तर सगळ्या गोष्टी या हळूहळू गोष्टी चुकीच्या होतात.'