मुंबई : Kangana Ranaut vs Javed Akhtar defamation case: अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील खटल्याचा निकाल 11 ऑगस्ट रोजी लागणार आहे. कंगनाने आपली नाहक बदनामी केल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. एका खासगी चॅनलवरील डीबेट शोमध्ये कंगना हिने आपली बदनामी होईल, असे विधान केल्याचा आरोप करत जावेद अख्तर यांनी न्यायालयात कंगनाविरोधी खटला दाखल केला आहे.


बहिणीची साक्ष नोंदवा - कंगना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कंगनाने बदनामीचा खटला सुरु होण्यापूर्वी मुंबईतील न्यायालयात धाव घेत तिची बहीण रंगोली चंदेल हिचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदवण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आपल्या आणि जावेद अख्तर यांच्यातील 2016 च्या भेटीबाबत आपण ही वक्तव्य केली आहेत.  त्या भेटीच्यावेळी आपली बहीण रंगोलीदेखील होती. यामुळे या प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जावा, असे कंगनामार्फत न्यायालयात सांगण्यात आले आहे.


याबाबत कंगनाने फौजदारी कलम 311 अंतर्गत नवीन अर्ज दाखल केला आहे. अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीश आर. आर. खान यांनी आता बदली झाली आहे. मात्र त्यांनी आपल्या बहिणीचा जबाब नोंदवला नाही, असेही कंगनाने अर्जात नमुद केलेले आहे.  


अचूक तथ्य रेकॉर्डवर आणण्यासाठी न्यायालयाने चंदेल यांचे म्हणणे तपासणे आणि रेकॉर्ड करणे आवश्यक आहे,असे कंगनाचे वकील रिजवान सिद्दिकी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे. दरम्यान, अख्तर यांनी असा युक्तिवाद केला की सध्याचा अर्ज कायदेशीर प्रक्रियेच्या सध्याच्या टप्प्यावर ठेवता येणार नाही.


दोन्ही बाजूने विस्तृत युक्तिवाद केल्यानंतर आता महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम. शेख 11 ऑगस्ट रोजी अर्जावर निकाल देणार आहेत.