मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने कुणा अभिनेत्याशी किंवा नेत्याशी नाही तर चक्क एका आयपीएसशी अधिकाऱ्यासोबत पंगा घेतला आहे. कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत IPS अधिकारी रुपा मुदगल बाबत ट्विट केलं आहे. ज्यामध्ये कंगनाने IPS रुपा यांच्यावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ नोव्हेंबर रुपा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये फटाके हे भारतीय परंपरेचा भाग नसल्याचं म्हटलं आहे. याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात केलेला नाही. या ट्विटमुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. 



#ShameOnYourIPSRoopa या हॅशटॅगवरून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत राहिला.



IPS रुपा यांना सस्पेंड करायला हवं. त्या पोलिसांच्या नावावर धब्बा आहेत. असं देखील कंगनाने यावेळी म्हटलं आहे.