मुंबई : मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कंगना आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. असं असताना 'कंगनाने मुंबई सोडावी', असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून 'कंगनाने मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे', असं म्हणून इशारा दिला होता. कंगना हिमाचल प्रदेशच्या मंडीहून चंदीगडला रवाना झाली आहे. दुपारी १२.३० वाजता तिचं तेथून विमान असेल. कंगना आज दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आतापर्यंत तीन ट्विट केले आहेत. यातील पहिल्या ट्विटमधून तिने आपण राणी लक्ष्मीबाईंवर आधारित सिनेमा साकारला. त्यांच्या वचनाप्रमाणे मी चालणार आहे, असं कंगनाने या ट्विटमधून म्हटलं आहे.



'माझ्या सिनेमातून मी राणी लक्ष्मीबाई यांच साहस, शौर्य आणि बलिदान साकारलं आहे. दुःखाची गोष्ट हीच आहे की, माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून मला रोखलं जात आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या पाऊलावर चालणार आहे. मी घाबरणारही नाही आणि कुणा समोर झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठवणार आहे. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'



मी बारावर्षांपासून हिमाचल सोडून चंदीगड हॉस्टेलमध्ये राहिली. त्यानंतर दिल्लीत राहिली. सोळा वर्षांची असताना मुंबईत आली. काही मित्रांनी सांगितलं की, मुंबईत तिच व्यक्ती राहते ज्या व्यक्तीला मुंबादेवी ठेवू इच्छिते.



कंगना आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणते की, 'मुंबई हे माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सगळं काही दिलं. मात्र, मी देखील महाराष्ट्राला आपली भक्ती आणि प्रेम करणारी एक मुलगी भेट दिली आहे. जी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्त सुद्धा देऊ शकते. जय महाराष्ट्र.'