कंगना रानौतचे बिकीनी फोटोशूट
अभिनेत्री कंगना रानौतने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या बिनधास्त वर्तवणूकीमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या बिकीनी फोटोशूटमुळे. हे फोटोशूट तिने एका मॅगझिनसाठी केले आहे. कंगनाच्या ऑफिशियल टीमने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूडची क्वीन
कंगनाने इमरान हाश्मीसोबत गँगस्टर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमाचे दिग्दर्शन २००६ मध्ये अनुराग बासू यांनी केले होते. तेव्हापासून सुरु झालेला बॉलिवूडच्या प्रवासाने कंगना बॉलिवूडची क्वीन केले. फक्त बॉलिवूड नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ओळख कायम आहे. याच वर्षी मे मध्ये झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने वर्णी लावली.
या दोन सिनेमांमध्ये व्यस्त
कंगना सध्या मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय राजकुमार रावसोबत मेंटल है क्या या सिनेमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल.