मुंबई : गत वर्षापासून बॉलिवूडमध्ये बायोपिक साकारण्याचे सत्र सुरू आहे. राजकारणी, खेळाडू यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आल्याने राजनैतिक बायोपिक मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. यातच आणखी एका राजकारणी व्यक्तिमत्वावर बायोपिक साकारण्यात येणार आहे. साऊथ चित्रपटातील अभिनेत्री आणि राजकारणात उच्च स्थानावर आपले नाव कोरलेल्या जयललीता यांच्या आयुष्यावर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. तर जयललीता यांचे व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगणाने 2019 मध्ये 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिवर चित्रपटाने चांगलीच मजल मारली आणि प्रेक्षकांची, समिक्षकांची मने जिंकली.



ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तरण म्हणाले, 'कंगणा लवकरच आपल्याला जयललीता यांचे व्यक्तिमत्व साकारताना दिसणार आहे. जयललीता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद चित्रपटाचे लेखण करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.' तरण आदर्श यांच्या सोबत ट्रेड अॅनलिस्ट  जलापथी गुडेली यांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिला आहे.