मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. राजकीय, सामाजिक आणि  इतर चालू घडामोडींवर लक्ष ठेवत, कंगना कोणाला बोलण्याची संधी सोडत नाही. प्रत्येक वेळेस कंगना तिच्या वक्यव्यांमुळे चर्चेत असते. कधी बॉलिवूड तर कधी महाराष्ट्र सरकारवर कंगना टीकास्त्र सोडत असते. आता सुद्धा तिने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार सध्या लॉकडाऊच्या विचारात आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या लॉकडाऊन तिने प्रतिक्रिया दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना ट्विट करत म्हणाली, कोणी मला सांगू शकेल महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे? सेमी लॉकडाऊन आहे? नकली लॉकडाऊन आहे? याठिकाणी काय होत आहे?' असा प्रश्न कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. सध्या कोरोना रूग्णांची  संख्या  वाढत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. 


लॉकडाऊनबद्दल बोलताना कंगना म्हणाली, 'निर्णायक निर्णय झाला पाहिजे. चंगू मंगू यांचं  अस्तिस्व सध्या संकटात आहे..' कंगनाच्या अशा वक्तव्यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे. सांगायचं झालं तर सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत असतात.