Kangna Ranaut Tweet: सध्या जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांच्या घरी प्री वेडींग सोहळा सुरु आहे. सोशल मीडियात या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडच्या प्री वेडींगला सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. दरम्यान अनंत अंबानीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. या व्हिडीओत अनंत अंबानी  हे प्रभू राम आणि सितेचे उदाहरण देऊन आपल्या भावा बहिणींचे बॉण्डींग सांगत आहेत. यावरुन त्यांचे कौतूक केलं जातंय. या कौतुक सोहळ्यात कंगनाही कुठे मागे राहिली नाहीय. कंगनाने केलेलं कौतुक ऐकून सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलीय. असं नेमकं काय म्हणाली कंगना? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे कंगना अनंत अंबानीचं कौतुक करताना थांबत नाहीय तर तिने पुन्हा एकदा यात बॉलिवूड घुसवलंय. लोकांना तिची ही गोष्ट अजिबात आवडली नाहीय. अनंत अंबानी हे गुजरातच्या जामनगरमधील ड्रीम प्रोजेक्ट 'वंतारा' बद्दल बोलत होते. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांनी भावा-बहिणीतील प्रेमावर भाष्य केले. या व्हिडीओमध्ये अनंत अंबानी म्हणतायत, आम्हा भावा-बहिणीमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. मोठा भाऊ आकाश अंबानी राम आणि वहिनी श्लोका मेहता सीतेप्रमाणे आहे. बहिण ईशा अंबानी आपल्या आईप्रमाणे आहे. आम्ही सर्व एकमेकांची मदत आणि रक्षा करतो. मला ते जे सांगतील त्याप्रमाणे मी करतो, असे अनंत अंबानींनी म्हटले. 


कंगनाने केलं कौतुक 



हा व्हिडीओ कंगनाने पाहिला आणि स्वत:ला रोखू शकली नाही. तिने यावर ट्विट केलं.  अनंत हे संस्कृतीशी जोडले गेले आहेत खूप सज्जन आहेत. याशिवाय त्यांच्यातील विशेष गोष्ट म्हणजे ते माफिया आणि ड्रग्जचा वापर करणाऱ्या गॅंगसोबत फिरत नाहीत. त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा!


प्रत्येक ठिकाणी बॉलिवूड का  घुसवतेस? 



कंगनाने इतकं लिहिलं आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. अनंत अंबानींचे कौतुक करण्याची तिची पद्धत लोकांना आवडली नाही. लोकांनी तिला चांगलच सुनावलं. प्रत्येक ठिकाणी बॉलिवूडला मध्ये घेणं लोकांना आवडलेलं नाहीय. प्रत्येक ठिकाणी बॉलिवूड? असा प्रश्न एका युजरने तिला विचारला. असं वाटतं की तुझ्या जुन्या क्लिप तुला दाखवाव्यात. पण मला हे करायचं नाहीय, असे एकाने म्हटले. 


तुला कसं माहिती पडलं की ते बॉलिवूडच्या गॅंगसोबत फिरत नाहीत ते? असा प्रश्न एका युजरने विचारला. तर आणखी एक यूजरने म्हटले की, घाबरु नका आंटी, तुमचा पुढचा सिनेमादेखील डिझास्टर असेल. तर रणबीर त्यांचा बेस्ट फ्रेण्ड असल्याचे एका युजरने म्हटले.