Suriya upcoming Movie Kanguva Disha Patani Will Be seen : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत जे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Industry) पदार्पण करत असल्याचे आपण पाहतोय. दरम्यान, हे सेलिब्रिटी दाक्षिणेतील सुपरस्टार कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिशा लोकप्रिय तामिळ अभिनेता सूर्यासोबत (Suriya) स्क्रिन शेअर करणार आहेत. सूर्यानं सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'कंगुवा' असे आहे. सूर्यान त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तर हा सूर्याचा 42 वा चित्रपट आहे. 'कंगुवा' हा एका हीरोच्या जीवणावर आधारीत आहे. तर सूर्यासोबत या चित्रपटात दिशा आणि योगी बाबू देखील दिसणार आहे. तर हा चित्रपट 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट 10 भाषांमध्ये पाहता येणार आहे. 



दरम्यान, 'कंगुवा' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे गोवा, चेन्नई आणखी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. तर आधीच चित्रपटाच्या 50 टक्के भागाचे दिग्दर्शन आधीच झाले आहे. तर लवकरच पुन्हा एकदा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तर सूर्या आणि दिशा या दोघांच्या चाहत्यांना आशा आहे की हा चित्रपट पुढच्या वर्षाच्या म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल. तर दुसरीकडे सूर्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टीझर शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या आगामी चित्रपटाची निर्मिती ही स्टूडिया ग्रीनच्या 'कंगुवा' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर सूर्या हा 'कंगुवा' ही भूमिका साकारणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अजून समोर आलेली नाही. पण आता त्यांच्या चाहत्यांना आशा आहे की लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात येईल. 


हेही वाचा : 'शाहिद कपूरने माझं काम पाहिलं आणि मग...', Vanita Kharat नं सांगितलं 'तो' किस्सा


दरम्यान, दिशा पटानी विषयी बोलायचं झालं तर तिचे लाखो चाहते आहेत. दिशा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा सगळ्यात शेवटी एक व्हिलन रिटर्न या चित्रपटात दिसली होती. तर त्याआधी मलंग चित्रपटात तिला चाहत्यांनी पाहील होतं. तर एम. एस धोनी या चित्रपटामुळे दिशाला  लोकप्रियता मिळाली होती. दिशाही अनेक लोकप्रिय ब्रॅंड्सची ब्रँड अम्बॅसिडर आहे. तर तिला आता दाक्षिणात्य चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.