मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सत्यजित यांचे निधन झालं आहे. या बातमीने त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. बंगलोरच्या बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यजित यांनी वयाच्या 72 व्या वर्षी जगाला निरोप दिला आहे. ते बराच काळ आजारी होते. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2016 मध्ये गंभीर मधुमेहामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला होता.


चाहते देत ​​आहेत श्रद्धांजली 
अभिनेत्याला अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचं पार्थिव हेगडे नगर येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 च्या सुमारास त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. ही बातमी मिळाल्यानंतर चाहते आणि त्यांचे मित्र सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत ​​आहेत. सत्यजित यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.


सत्यजित यांचं खरं नाव सईद निजामुद्दीन आहे. ते एक बस ड्रायव्हर होते ज्याने रंगभूमीचा भाग बनून आपल्या अभिनयाचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांनी खलनायक म्हणून चित्रपटांमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यांनी तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.