Kichcha Sudeep Supports BJP: प्रसिद्ध कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) याने भाजपाला (BJP) आपण पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. कर्नाटकात (Karnataka) आपण भाजपासाठी प्रचार करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. किच्चा सुदीपच्या या निर्णयामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान किच्चा सुदीपने आपण राजकारणात प्रवेश कऱणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक निर्णय आपल्याला आवडले आहेत. पण त्याचा मी पाठिंबा देण्याशी काही संबंध नाही असं यावेळी त्याने सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी फक्त भाजपासाठी प्रचार करणार आहे. मी निवडणूक लढणार नाही," असं किच्चा सुदीपने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह त्याने पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्याने बोम्मई हे कोणत्या पक्षात आहेत याला महत्त्व न देता, मी त्यांना पाठिंबा देत राहणार आहे असं किच्चा सुदीपने सांगितलं. 



"मी बोम्मई सरांचा आदर करतो," असं सांगताना त्याने बोम्मई यांचा गॉडफादर असा उल्लेख केला. "जेव्हा मी सांगतो की, माझा बोम्मई यांना पाठिंबा आबे, तेव्हा ते सांगतील त्या सर्वांना माझा पाठिंबा असेल," असं त्याने सांगितलं. 



भाजपाची विचारसरणी तुला पटते का? असं विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा मी आदर करतो. पण त्याचा मी येथे बसण्याशी काही संबंध नाही".


दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी किच्चा सुदीपमुळे भाजपाला ताकद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. "किच्चा सुदीप खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे भाजपाला ताकद मिळेल. जनता राज्यात डबल इंजिन सरकारला पाठिंबा देईल," असं ते म्हणाले आहेत. 



कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे.. तसंच 13 मे रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कन्नडिगांचा प्रश्न, लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाचं आरक्षण आणि मुस्लिम समाजाचे धर्मावर आधारित आरक्षण रद्द करण्याचा निर्णय यावर ते भर देत आहेत. भाजपाचे सध्या विधानसभेत 119 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 75 आणि त्यांचा सहकारी पक्ष जेडीएसच्या 28 जागा आहेत.