मुंबई : सध्या सगळीकडे 'कांतारा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि दाक्षिणेत तो हिट ठरला. अभिनेता किचा सुदीप आणि धनुष यांनी त्याची प्रशंसा केली होती. 14 ऑक्टोबरनंतर हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषभ शेट्टीचं कौतुक होतं आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का की 'कांतारा' आधी ऋषभ काय काम करत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : 'तू कॉम्प्रोमाईझ करशील का?' 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'या' अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव


ऋषभनं नुकतीच पिंक व्हिलाला मुलाखत दिली. यावेळी ऋषभ म्हणाला, 'मी 3-4 महिने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. त्यामुळे माझी हिंदी चांगली आहे. 2006 साली प्रदर्शित झालेला ‘सायनाइड’ हा माझा पहिला कन्नड चित्रपट. त्यानंतर मी ‘मर्डर' या बॉलिवूड चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये काम केलं. मात्र, या चित्रपटानंतर माझ्याकडे काम नव्हतं. मग मला एका हिंदी चित्रपटाच्या सेटवर लोकल कोऑर्डिनेशनच काम मिळालं होत. त्यानंतर मी ऑफिस बॉय, कधी निर्मात्याच्या ड्रायव्हरच काम केले आहे.'



पुढे ऋषभ म्हणाली,'मला एडिटींगची आवड होती, मग मला सांगण्यात आलं की आम्ही तुला चांगल्या एडिटरकडे पाठवू पण मला माहित होतं तिकडेदेखील मला हेच काम करावं लागेल. कुठल्या ही ज्येष्ठ एडिटरकडे हे काम करावेच लागते. मला लक्षात आलं की माझं करियर काही होणार नाही आपण गावाला निघून जावे, म्हणून मी गावी परतलो. याविषयी सांगताना ऋषभ म्हणाला, 'कांताराचं चित्रीकरण माझ्या गावात करण्यात आलं. मी काही कन्स्ट्रक्शन साईटवर काम केले आहे त्यामुळे मला सेट लावताना मदत झाली.