Kantara Movie On OTT: संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपट कांताराची चर्चा रंगली आहे. अनेकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर भरभरून लिहिलं आहे. त्यामुळे हा चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जवळपास 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सुरुवातीला कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, परंतु प्रचंड लोकप्रियता आणि मागणीमुळे हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला. असं असलं तरी प्रत्येकालाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहाणं शक्य नाही. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार याबाबत विचारणा होत होती. अखेर चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा मुहूर्त ठरला असून 24 नोव्हेंबला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच आज रात्री 12 वाजता हा चित्रपट पाहू शकता. याबाबतचा अधिकृत टीझर प्राईम व्हिडीओनं ट्वीट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनय केलेला 'कांतारा' हा चित्रपट पवित्र प्रथा आणि परंपरा, दंतकथा आणि रहस्यांवर आधारित आहे. या चित्रपटात 1870 चा काळ दाखवण्यात आला आहे. एका राजाने देवता मानल्या जाणाऱ्या दगडाच्या बदल्यात गावकऱ्यांना आपली काही जमीन दिली होती. पण काही कालावधीनंतर राजाच्या वंशजांनी ती जमीन पुन्हा घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे वनाधिकारीही जंगल टिकवण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठी लागतात. त्यानंतर हा चित्रपट पुढे सरकतो आणि विविध घडामोडी घडतात. 



बातमी वाचा- 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर डान्स करणारी मुलगी रातोरात झाली Social Media स्टार, पाहा Viral Video


कांतारा या चित्रपटाला सेलिब्रिटींपासून समीक्षकांचीही दाद मिळाली आहे.  इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तीनशे कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 24 नोव्हेंबरपासून ओटीटीवर फक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये दिसणार आहे. कांताराचा हिंदी डब केलेला चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबाबतची घोषणा केलेली नाही. त्यामुळे चित्रपटप्रेमींना नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर Kantara Hindi OTT हा ट्रेंड सुरु झाला आहे. दुसरीकडे, लवकरच हिंदी कांतारा चित्रपट ओटीटीवर येईल, असं सांगण्यात येत आहे.