Kantara OTT Release : कधी आणि कुठे पाहू शकता `कांतारा`?
Kantara on OTT : `कांतारा` हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.
Kantara Released on Amazon Prime Video: दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) 'कांतारा' (Kannada Movie Kantara) हा कन्नड चित्रपट अजुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाच्या बाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटानं चौथ्या आठवड्यातही बक्कळ कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित 'कंतारा' हा आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांपैकी एक असण्याची अपेक्षा आहे. तर काही प्रेक्षक हे चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट सुरुवातीला कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, परंतु प्रचंड लोकप्रियता आणि मागणीमुळे हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला. (Kantara)
'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्स खूप आधीच खरेदी करण्यात आले होते. कांतारा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपटगृहातील त्याची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी अद्याप ओटीटी प्रदर्शनाची तारिख दिली नाही. तरी सध्या असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. (Kantara OTT Release)
विजय किरगांडूर निर्मित आणि होंबळे फिल्म्स प्रस्तुत 'कांतारा' 19 नोव्हेंबर 2022 रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या विषयी अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Kantara OTT release date When and where can you watch the movie)
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला बरेच चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांचा 'ब्रह्मास्त्र' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डिज्नी प्लस हॉयस्टारवर पाहू शकता. मणिरत्नम यांचा Ponniyin Selvan: I हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चननं मुख्य भूमिका साकारली आहे. तर नागार्जुन यांचा The Ghost हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा एक अॅक्शनपट आहे. या चित्रपटात नागार्जुन यांच्यासोबत सोनल चौहान, गुल पनागसारखे कलाकार आहेत.