Kapil Sharma and Bharti Singh Ramp Walk With Daughter and Son : लोकप्रिय कॉमेडी अभिनेता कपिल शर्मा हा त्याच्या जबरदस्त पंचसाठी ओळखला जातो. त्याचा कॉमेजडी नाइट्स विथ कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना हसवत राहतो. फक्त या कॉमेडी शोच्या माध्यमातून नाही तर त्याचे शो आणि चित्रपटांसाठी देखील कपिल चर्चेत राहतो. आता कपिल चर्चेत असण्याचं कारण वेगळंच आहे. यावेळी कपिल चर्चेत असण्याचं कारण त्याची लेक आहे. कपिलनं त्याच्या लेकीसोबत रॅम्प वॉक केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी कपिलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम एक फॅशन शो होता. त्यावेळी कपिल त्याच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत रॅम्प वॉक करताना दिसला. यावेळी लेकीचा हाथ पकडलेला कपिल चालत असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कपिलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इंस्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. त्या व्हिडीओत कपिल त्याची लेक अनायराला फ्लाइंग किस देण्यास सांगितले. तर अनायरानं तिचे वडील कपिलला फ्लाइंग किस दिली.  कपिल आणि त्याची लेक अनायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कपिलच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'हा खूप क्युट व्हिडीओ आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भारतीवर गेली आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'छोटी गिन्नी.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अरे यार ही सेम तिची आई गिन्नीसारखी दिसते.' दुसरा नेटकरी कपिलची स्तुती करत म्हणाला, 'तू खूप हसवलसं. प्रत्येक दिवस तो एक औषध म्हणून आपल्या मदतीसाठी धावून आला, मग तेव्हा तुम्ही आजारी असा किंवा मग उदास, तुझा शो पाहूल्यानंतर सगळं ठीक झालं असं वाटायचं. लव्ह यू कपिल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ही मुलगी किती मासुम आहे आणि तिची स्माईल तर... कपिलची मुलगी आहे म्हणून नाही तर ती मुलगी खरंच खूप सुंदर आणि क्युट आहे.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : चित्रपटातील 'त्या' किसींग सीननंतर Madhuri Dixit ला झाला होता पश्चाताप, घेतला मोठा निर्णय


याच कार्यक्रमात कपिल शर्मा व्यतिरिक्त लोकप्रिय कॉमेडियन आणि कॉमेडी क्वीन भारती सिंहनं हजेरी लावली होती. यावेळी तिचा मुलगा गोला देखील तिच्यासोबत रॅम्पवॉकवर होता. पण तिच्यासोबत कॉमेडीयन कृष्णा अभिषेक देखील दिसला. यावेळी कृष्णानं गोलाला उचलून धरले होते. तर भारती आणि कृष्णाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.