मुंबई : लोकप्रिय कॉमेडिअन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोवर (Sunil Grover) या दोघांनी अनेक वर्ष छोट्या पडद्यावर एकत्र काम केलं आहे. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सुनील ग्रोवरने स्वतःला कपिलच्या शोपासून वेगळं केलं. यानंतर दोघांना एकत्र एकाच स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता प्रेक्षकांची उत्सुकता संपणार असं दिसत आहे. कारण चाहत्यांना सोशल मीडियावर एक फोटो पाहायला मिळाला आहे. ज्या फोटोत कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर एकत्र दिसत आहेत. या फोटोत आणखी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान. 



20 डिसेंबर रोजी सोहेल खानच्या वाढदिवसाची पार्टी झाली. या पार्टीत सुनील आणि कपिल दोघंही उपस्थित होते. या दोघांनी सलमान खानसोबत एकत्र फोटो काढला आणि कपिलने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. यानंतर असा अंदाज दर्शवला जात आहे की, कपिल आणि सुनील या दोघांमधील दुरावा गेला असून आता ते पुन्हा एकत्र आले आहेत. 


तसेच कपिल शर्माच्या पत्नीने गिनी छतरथ हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपिल शर्माने ही आनंदीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर सुनील ग्रोवरने कपिलला आणि त्याच्या पत्नीला मनापासून शुभेच्छा दिल्यात. यावरून या दोघांचे वाद मिटले असून ही गोडजोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय.