Virat Kohli ने कॅप्टन्सी सोडल्यानंतर Kapil Sharma चं मोठं वक्तव्य, व्हिडिओची एकच चर्चा
यावर कपिल शर्मा लगेच म्हणतो...
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंगसाठी ओळखला जातो. कपिल प्रत्येक वीकेंडला त्याच्या 'द कपिल शर्मा शो' शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. नुकतीच अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले. शाहिद आणि मृणाल त्यांच्या जर्सी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.
कपिल विराटच्या कॅप्टन्सीबाबत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये कपिल दोन्ही स्टार्ससोबत बोलताना दिसत आहे. यासोबतच शोचे इतर विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि चंदन प्रभाकर देखील पाहुण्यांचे मनोरंजन करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट क्रिकेटशी संबंधित आहे. कपिल शर्माने यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे.
प्रोमो व्हिडिओमध्ये चंदन प्रभाकर क्रिकेटमधील त्याच्या आवडीबद्दल बोलत असल्याचे दिसून येते. चंदन शाहिद कपूरला सांगतो- 'सर, तुमचा चित्रपट क्रिकेटवर येतोय. मलाही क्रिकेटमध्ये खूप रस आहे.
यावर कपिल शर्मा लगेच म्हणतो- 'होय, जेव्हा पासून चंदनने क्रिकेटमध्ये रस घेतला आहे, विराट कोहलीने तर कर्णधारपद सोडले आहे.' हे ऐकून सगळे हसायला लागतात.
या वीकेंडला कपिल शर्मा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे, समोर आलेल्या प्रोमोवरून ते स्पष्ट झाले आहे. शाहिद कपूरच्या 'जर्सी' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहिदसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा एका माणसावर आधारित आहे जो आपल्या मुलासाठी क्रिकेटच्या जगात पुन्हा प्रवेश करतो.