मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' घेऊन येतोय. सोनी टीव्ही वर २५ मार्चपासून हा शो सुरू होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलला शो चा पहिला पाहुणा अभिनेता अजय देवगण असणार आहे. यासाठी कपिलने अजयला कॉल करुन निमंत्रणही दिले. पण अजयचे उत्तर वेगळेच होते.


प्रोमो व्हायरल 


अजय देवगण 'रेड' सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शो मध्ये येणार आहे. कपिल अजयला फोन करतो असा प्रोमो व्हायरल होतोय. 


यामध्ये अजय कपिलला वाट पाहायला लावतो. 'तुमचा कॉल प्रतिक्षेत आहे,ज्याप्रमाणे तुम्ही लोकांना वाट पाहायला लावता असे अजय सांगतो.



पण दुसऱ्या क्षणातच तो शो वर येण्याचे आश्वासन देतो. या प्रोमोत कपिल स्वत:वर झालेल्या आरोपांची खिल्ली उडविताना दिसतोय. रिपोर्टनुसार एपिसोडची शुटींग पूर्ण झाली आहे. 


कपिलने मानले आभार 


कपिलने ट्विट करुन 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा'मध्ये आल्याबद्दल अजयच आभार मानले आणि 'रेड' ला शुभेच्छा दिल्या. 


ज्यांच्याकडे काही कमाई असते त्यांच्याकडेच 'रेड' टाकली जाते, तुम्ही त्या योग्य आहेत असे उत्तर अजयने ट्विट करुन दिले.  


अजय रागावला 


गेल्यावर्षी 'बादशाहो' च्या रिलीजवेळी अजय पूर्ण टीमसोबत सेटवर पोहोचला होता.पण कपिलने ऐनवेळी शूटींग रद्द केलीय त्यानंतर अजय देवगण कपिलवर रागावल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते.