मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या कार्यक्रमातून जवळपास आठ महिन्यानंतर छोट्या पडद्यावर परतलाय. परंतु, त्याचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या काही फारसा पसंतीस उतरलेला दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कपिल एक गेम शो घेऊन आलाय परंतु, प्रेक्षक मात्र थोडे नाराजच दिसत आहेत. कार्यक्रमात कपिल पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात दिसला. कपिलचे फॅन्स त्याच्या जुन्या कार्यक्रमाची सतत आठवण काढताना दिसतात तसाच कपिल शर्माही आपल्या जुन्या टीमच्या आठवणींत कधी कधी रमतो. त्याचीच एक झलक कपिलच्या सोशल मीडियामध्येही दिसली. 


कपिलच्या जुन्या 'कॉमेडी नाइटस् विथ कपिल शर्मा' आणि 'द कपिल शर्मा शो' या दोन्ही कार्यक्रमांत त्याच्यासोबत सुनील ग्रोवर, कीकू शारदा, चंदन प्रभावकर, अली असगर आणि सुमोना चक्रवर्ती यांसारखे कलाकार दिसले होते. परंतु, कपिलच्या नव्या कार्यक्रमात मात्र त्याच्यासोबत चंदन प्रभाकर, कीकू शारदा आणि सिद्धू दिसले. 


याच कारणानं कपिलनं आपलं दु:ख ट्विटरवर एक ट्विट करत व्यक्त केलंय. आपल्या जुन्या टीमला आपण आत्ताही मिस् करत असल्याचं कपिलनं या ट्विटमध्ये म्हटलंय. 

कपिलच्या नव्या कार्यक्रमाला त्याचा जुना सहकलाकार अली असगरनं दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देताना कपिलनं म्हटलंय 'थँक्यू अली भाई... मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करतोय... हा तोच मंच आहे ज्यावर आपण कॉमेडी नाईटसची शूटिंग करत होतो... केवळ मीच जाणतोय की तुमच्याविना शुटिंग करताना कसं वाटतंय... लव यू'