मुंबई : कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या आपल्या 'द कपिल शर्मा शो' पेक्षा त्याभोवती जोडलेल्या वादांमूळे जास्त चर्चेत आहे. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे.


कपिलचा पंगा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामागचे कारण म्हणजे त्याने चक्क बॉलीवूड एक्ट्रेस सनी लिऑनीशी तसेच अरबाज खान यांच्याशी पंगा घेतला आहे. त्यामूळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


दोन्ही सिनेमा २४ नोव्हेंबरला 


सनी लिऑनीचा बोल्ड डान्स असलेला 'तेरा इंतजार' हा सिनेमा येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान चा हा सिनेमा आहे.


त्यामूळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हंगामा करणार एवढ नक्की आहे. त्यातच कपिल निर्माता असलेला 'फिरंगी' हा सिनेमाही २४ तारखेलाच प्रदर्शित होत आहे.


सिनेमांची तुलना 


कॉमेडिअन नंतर अभिनय क्षेत्रात कपिलने आपले नशिब आजमावले. आता कपिल हा फिरंगी या सिनेमाद्वारे निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे.


निर्माता म्हणून कपिलचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.  त्यात अरबाजची निर्मिती असलेला 'तेरा इंतजार' हा एकाच दिवशी पाहायला मिळणार आहे.


साहजिकच या दोन्ही सिनेमांची तुलना होणार आहे. 


सर्वांचे लक्ष 


या दोन्ही सिनेमांमध्ये कोण जास्त कमाई करणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


पण कपिलने त्याच दिवशी आपला सिनेमा उतरवून अरबाज खान, सनी लिऑनी यांना टक्कर देण्याचे आव्हान स्वीकारले आहे.


हे आव्हान तो कसे पेलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.