मुंबई : कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येतो, त्यामुळे कपिल शर्माच्या आयुष्यातही ती वाईट वेळ आली आणि तो अशा संकटात अडकला की त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले. कपिल शर्माने काही वाईट सवयींमुळे अनेक समस्यांचा सामना कसा करावा लागला याचा खुलासा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्येचा विचार
कपिल शर्मा हा एक असा स्टार आहे, ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप काही मिळवले. पण त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि याच काळात तो आत्महत्येचा विचार करू लागला, त्यानंतर शाहरुख खान त्याच्या आयुष्यातला मसिहा बनला. तो आला आणि त्यांने या संकटातून बाहेर काढले. कपिल शर्माच्या वाईट काळात शाहरुख खान त्याच्यासाठी मसिहा बनून आला होता. याचा कपिलनेच खुलासा केला.


कॉमेडीयन कपिल शर्माने एका मुलाखतीदरम्यान अल्कोहोल सेवन आणि चिंता याविषयी सांगितले होते. या दोन्ही अडचणींतून बाहेर पडण्यासाठी शाहरुख खानने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. कपिलने सांगितले होते की, त्याने दारू पिण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये सतत खाली पडत होता. मात्र शाहरुख खानच्या मदतीने तो पुन्हा रुळावर आला.


समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न 


'फिरंगी' चित्रपटादरम्यान कपिलने सांगितले होते की, शाहरुख खानने त्याला मानसिक आणि शारीरिक मार्गदर्शन केले होते आणि मद्यसेवन आणि त्याच्या नर्व्हसनेसमधून बाहेर काढले होते. त्याने सांगितले की, एकेकाळी तो इतका डिप्रेशनमध्ये गेला होता की, त्याला स्टेजवर परफॉर्म करायलाही भीती वाटत होती आणि तो आपल्या कुत्र्यासोबत ऑफिसमध्ये कोंडून राहायचा. त्याच्या शोमध्ये लोक येणे बंद झाले आणि तो लोकांच्या रडारवरून पडू लागला.


मात्र, त्याचा मूड थोडा बदलण्यासाठी त्याच्या एका मित्राने त्याला काही दिवस त्याच्या सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहण्याचा सल्ला दिला. अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर समोरचा अथांग समुद्र पाहून त्यात उडी मारावी असे त्याच्या मनात आले होते.