`बिग बीं`नी कपिलसाठी हे काम, कपिलने मानले आभार
कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या त्याचा सिनेमा फिरंगी च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
मुंबई : कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या त्याचा सिनेमा फिरंगी च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
स्टॅण्ड अप कॉमेडिअन नंतर अभिनय क्षेत्रात उतरलेला कपिल या सिनेमाच्या निमित्ताने निर्मात्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. दरम्यान कपिल याने 'बीग बी' अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.
आवाजाची जादू
या ट्विटनंतर कपिलच्या फॅननेही कपिलला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय अमिताभ बच्चन सर, तुमचे खुप-खुप आभार. आताच चित्रपट पाहिला आणि मी शब्दात वर्णन करु शकत नाही की, तुम्ही तुमच्या आवाजाच्या जादूने या चित्रपटाला किती मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.’
त्यामूळे फिरंगी या सिनेमासाठी बिग बी यांनी आवाज दिल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बींच्या आवाजाची कमाल पाहण्याची उत्सुकता सिनेप्रेमींना लागली आहे.
तुलना
कॉमेडिअन नंतर अभिनय क्षेत्रात कपिलने आपले नशिब आजमावले. आता कपिल हा फिरंगी या सिनेमाद्वारे निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे.
निर्माता म्हणून कपिलचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. त्यात अरबाजची निर्मिती असलेला 'तेरा इंतजार' या दरम्यान पाहायला मिळणार आहे.
साहजिकच या दोन्ही सिनेमांची तुलना होणार आहे.
सेन्सॉर बोर्डाचा दणका....
सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगरा यांनी सांगितले की, ‘फिरंगी’ येत्या २४ नोव्हेंबरला रिलीज होणार नाहीये. सेन्सॉर या आठवड्याच्या सुरूवातीला सिनेमाला सर्टिफिकेट देणार अशी कपिलच्या टीमला अपेक्षा होती. पण सेन्सॉर सर्टिफिकेट २४ नोव्हेंबरला मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
रिलीज नाही
इतका कमी वेळ मिळाल्याने सिनेमा सध्या रिलीज केला जाऊ नये’असा निर्णय कपिल शर्मा आणि डिस्ट्रिब्यूटर अनिल थडानी यांनी घेतल्याचे कळते.