हिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला 'फॉलोअर्स वाढवण्यासाठी...'

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळातून जात आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. ज्याची ट्रीटमेंट सुरु झाली आहे. हिनानं लवकरात लवकर ठीक व्हाव यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. पण एका इनफ्लुएन्सरला वाटतं की हिना हा सगळा ड्रामा करत आहे. ती खोट बोलत असल्याचं त्यानं म्हटलं. ही कोण इनफ्लुएन्सर आहे ते जाणून घेऊया...  

| Jul 06, 2024, 16:15 PM IST
1/7

हिना खानची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील ‘अक्षरा’ ही भूमिका सगळ्यांच्या आजही लक्षात आहे. हिना खानला वयाच्या 36 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर झाला. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याविषयी बातमी दिली. 

2/7

कीमोच्या सुरुवातीलाच हिनानं तिचे केस कापले. हिनाच्या कॅन्सरच्या आजारानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तर या सगळ्यात त्या इनफ्लुएन्सरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

3/7

त्या बातमीनंतर जिथे कुटुंब आणि मित्र, एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि त्याचे चाहते हिंम्मत देत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये स्पर्धक असलेल्या पुनीत सुपरस्टारच्या रिअॅक्शन समोर आला आहे. पुनीतनं तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर करत त्या बातमीला फेक म्हटलं आहे. 

4/7

पुनीतच्या म्हणण्यानुसार, 'हिना खाननं तिच्या ब्रेस्ट कॅन्सरची खोटी बातमी पसरवली आहे. त्याच्या व्हिडीओमध्ये जर हिना खानला खरंच कॅन्सर सारखा आजर झाला आहे. तर भाऊ आपल्याच अकाऊंटवरून कोण आपल्या आजाराची पोस्ट करतं? आपल्याच आजाराची रिपोर्ट पोस्ट कोण करतं? भाऊ हे लोकं काय करतायत, इन्फ्लुएन्सर आजकाल त्यांचा आजाराचं खोटं नाटक असतं आणि सोशल मीडियावर टाकतात. ज्यानं त्यांचे लाइक, फॉलोवर्स आणि व्ह्यूज वाढतात.'

5/7

पुनीतनं पुढे सांगितलं 'मला नाही वाटतं की हिना खानला कॅन्सर झाला आहे. मला नाही वाटतं... आता काही दिवसांनंतर एक पोस्ट येईल आणि त्यात लिहिलेलं असेल मी बिल्कुल ठीक आहे. सगळ्या चाहत्यांचे आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांसाठी आभारी.' 

6/7

पुनीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली की भावा, 'तुला देखील झाला होता. तू पण अॅडमिट होतास आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.'

7/7

पुनीत सुपरस्टारला काही दिवसांपूर्वी माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि तो देखील रुग्णालयात होता. त्याच्या मित्रांनी आणि कंटेट क्रिएटर जोगिंदरनं त्यांच्या तब्येतीवरून एक अपडेट दिली आहे. ज्यावरून सोशल मीडियावर नेटकरी निशाणा साधत आहेत.