Kapil Sharma New Instagram Post: सध्या द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) हा शो नव्यानं सुरू झाला आहे. या नव्या शोमध्ये नवे कलाकारही आले आहेत. काही जुने कलाकारही यावेळी या शोमध्ये सहभागी झाले आहेत परंतु काही जुन्या कलाकारांनी या शोला कायमचा रामराम ठोकला आहे. यावरून कपिल शर्मावरही अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. कपिल शर्माला वाईट पद्धतीनं (Kapil Sharma Trolling) ट्रोलही करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नरमावलेला कपिल शर्मा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळच कारणही तेच आहे. (kapil sharma shares new instagram post with caption pati patni aur woh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नुकताच कपिल शर्मानं एक इन्ट्राग्राम पोस्ट (Kapil Sharma Instagram Post) केली आहे. यावरून सध्या सगळीकडेच वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की कपिलनं आपल्या पत्नीसोबत म्हणजेच गिन्नी चतरथसोबत (Kapil Sharma Wife Photos) एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ते कुठेतरी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गेलेले दिसतात. या फोटोखाली त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की पती पत्नी और वो... आणि पुढे ते जिथे आहेत त्या ठिकाणंचं नावं लिहिलं आहे. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


जर तुम्ही सध्या कपिल शर्माच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर तो एकतर त्याच्या नवीन लूकचे फोटोज शेअर करताना दिसतो किंवा तो पत्नी गिन्नीसोबत घालवलेले सुंदर क्षण शेअर करतो. दिवाळीच्या पार्ट्यांपासून ते परदेशी प्रवासापर्यंत तो बहुतेकदा पत्नी गिन्नीसोबत दिसत होता. कपिल शर्माच्या या बदललेल्या स्टाईलमागचे कारण काय आहे हे सांगणे आता थोडे कठीण आहे, पण त्याच्या लुकच्या बदलामागे पत्नी गिन्नी आहे हे मात्र नक्की. 'द कपिल शर्मा शो'च्या नवीन सीझनसाठी कॉमेडियनचा लूक त्याची पत्नी गिन्नी चतरथने स्टाईल केला आहे. सोशल मीडियावरही (Kapil Sharma Social Media) चाहते कपिल शर्माच्या नव्या लूकचे कौतुक करताना दिसत आहेत.


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?



कपिलचा बदललाय लुक? 
सध्या कपिल आपल्या नव्या लुकवरून सगळीकडेच व्हायरल होतो आहे. त्यानं लुक बदलला का आणि आता आपल्या बायकोला सोडून तो बाकी हिरोईन्सला इम्रेंस करण्याच्या विचारात आहे का, अशा पद्धतीचं ट्रोलिंग सध्या मीडियामध्ये सुरू झालं आहे.