टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिने खूप नाव कमावले आहे. अभिनेता करण कुंद्रासोबत 'कितनी मोहब्बत है' (Kitni Mohobatt Hai) या टीव्ही मालिकेतील आरोहीच्या भूमिकेतून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी कृतिका आता बी-टाऊनचा एक भाग बनली आहे. 

Updated: Oct 26, 2022, 12:24 PM IST
टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य  title=

Kritika Kamra on Nepotism: नेपोटिझमवर बोलणं काही थांबलं जात नाहीये. कित्येक अभिनेत्री किंवा अभिनेते आपलं मतं कायमच मांडत आले आहे. अभिनेत्री कंगना राणावतही हा मुद्दा उचलून धरला होता. आजही नेपोटिझमवर अनेक अभिनेत्री भाष्य करताना दिसत आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं बॉलिवूडच्या घराणेशाहीचा (Bollywood Nepotism) मुद्दा उपस्थित केला आहे. (TV actress Kritika Kamra made a harsh statement on Bollywood nepotism says makers would go to somebody they have a soft corner for)

कृतिका कामरा (Kritka Kamra) ही हिंदी टेलिव्हिजनवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आत्तापर्यंत अनेक उत्तोमोत्तम टेलिव्हिजन मालिका केल्या आहेत. सध्या ती ओटीटीवर आपलं नावं कमावते आहे. नुकतीच तिची हूश हूश (Hush Hush) ही मालिका ओटीटीवर प्रसिद्ध झाली होती. 

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिने खूप नाव कमावले आहे. अभिनेता करण कुंद्रासोबत 'कितनी मोहब्बत है' (Kitni Mohobatt Hai) या टीव्ही मालिकेतील आरोहीच्या भूमिकेतून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी कृतिका आता बी-टाऊनचा एक भाग बनली आहे. दरम्यान कृतिका कामरा हिने इंडस्ट्रीतील घराणेशाहीबाबत मोठा खुलासा केला आहे. कृतिकाच्या मते नेपोटिझममुळे बाहेरच्या लोकांना कास्ट करण्यात खूप अडचण येत आहे.

25 ऑक्टोबरला कृतिका कामरा हिने तिचा वाढदिवसही (Kritika Kamra Birthday) साजरा केला आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत कृतिका कामराने इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर खुलेपणाने भाष्य केले आहे. कृतिका कामरा म्हणाली की 'प्रत्येक क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातही घराणेशाही आणि पक्षपाताचा प्रवाह आहे. मी स्वत:ला घराणेशाहीचा बळी मानत नसले तरी मला माझ्या क्षमतेनुसार संधी मिळाल्या आहेत. पण कधी कधी वाटतं की मला जी पात्रं मिळाला हवी होती ती दुसरे करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेपोटिझममुळे बाहेरच्या लोकांना फार प्रोब्लेम होतो आणि त्यातून नेपोटिझममुळे स्टार कीड्स बद्दल सॉफ्टकॉर्नर निर्माण होते. बहुतेक वेळा मी निर्माते त्यांच्या ओळखीच्या लोकांकडे जातात असे पाहिले आहे. त्यामुळे बाहेरील लोकांसाठी कास्टिंग करताना अनेक अडचणी येत आहेत. त्याचा सामना कसा करायचा ते मला कळत नाही. तुम्ही मात्र त्याचे बळी होता. 

छोट्या पडद्यापासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत स्वत:च्या बळावर एक खास स्थान मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी कृतिका कामरा आहे. निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीच्या मित्रॉन या चित्रपटातून 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कृतिकाने सैफ अली खान आणि जुही चावला सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'तांडव' (Tandav) आणि 'हुश हुश' वेब सीरिजमध्ये कृतिका कामरा या दोन्ही चित्रपट कलाकारांसोबत OTT वर दिसली आहे.