मुंबई : द कपिल शर्मा शोचा (The Kapil Sharma Show)  नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. सध्या, कृष्णा अभिषेक यावेळी शोचा भाग नसल्याची बातमी समोर येत आहे. यामागचे कारण म्हणजे कृष्णा अभिषेकने फी वाढवण्याची मागणी केली होती. जी निर्मात्यांनी मान्य केलेली नाही. त्यामुळे आता हा मुद्दा समोर आला आहे की नेमक्या कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळतेय. चला तर मग जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा अभिषेक (Krushna abhishek) हा कपिल शर्मा शोचा सर्वात लोकप्रिय स्टार आहे. शो वर तर दरवेळी नवनवीन पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजत करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या सीझनमध्ये कृष्णाने एका एपिसोडसाठी 10-12 लाख रुपये घेतले होते. 


चंदन प्रभाकर (chandan prabhakar) ऊर्फ चंदु, जो कपिल शर्माचा लहाणपणीचा मित्र आहे. बहुतांश वेळी तो शोमध्ये चहावाल्याच्या भूमिकेत दिसलाय. त्याचे हे कॅरेक्टर खुप गाजलंय. चंदन प्रभाकर कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि त्यानंतर तो कपिल शर्मा शोच्या सर्व सीझनमध्येही दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार तो प्रती एपिसोड 7 लाख रूपये घेतो. 


भारती सिंग (bharti singh)  देखील या शोशी बऱ्याच काळापासून जोडली गेली आहे. पण गेल्या सीझनमध्ये प्रेग्नेंसीमुळे भारती फार कमी वेळा दिसली. त्यात  अशीही बातमी समोर आली आहे की, ती येत्या सीझनमध्ये दिसणार नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रेक्षकांना हसवण्यासाठी भारती प्रति एपिसोड 10-12 लाख रुपये घेते. 


सुमोना चक्रवर्ती (sumona chkraborty) देखील प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली आहे. ती कपिल शर्मा शोची सर्वात जुनी कलाकार आहे जी अजूनही या शोमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमोना एका एपिसोडसाठी 7 लाख रुपये फी घेते.


कधी बेबी यादव तर कधी बंपर नर्स बनून लोकांना खूप हसवणारा किकू शारदा (kiku sharda) कुणापेक्षा कमी नाही. त्याच्या विनोदांचा पिटारा प्रेक्षकांना खुप आवडतो.मीडिया रिपोर्ट्सनुसार, किकू शारदा एका एपिसोडसाठी 5-7 लाख रुपये घेतात.


कपिल शर्माच्या (kapil sharma) फीबद्दल बोलायचं तर सर्वांधिक फीस तो घेतो. सर्व कलाकारांपेक्षा तो दुप्पट फिस घेतो. मीडिया रिपोर्टनुसार कपिल एका एपिसोडसाठी ५० लाख रुपये घ्यायाचा. आता या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे हे कपिलच सांगू शकेल.