रणवीरनं दीपिकाला का नेलं कपिलच्या लग्नाला?.. खरं कारण आलं समोर
`द कपिल शर्मा शो`चा एक प्रोमो समोर आला आहे,ज्यामध्ये कपिल शर्मा रणवीरकडे दीपिकाबद्दल चौकशी करत आहे.
मुंबईः रणवीर सिंग सध्या त्याच्या 'जयेशभाई जोरदार' या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर लवकरच 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहे. आता या शोचा एक प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे.
व्हिडिओमध्ये रणवीर सिंग शोमध्ये त्याची को-स्टार शालिनी पांडेसोबत सोफ्यावर बसलेला दिसत आहे. त्यानंतर कपिलने रणवीरला दीपिकाबद्दल काहीतरी विचारले, ज्यावर अभिनेत्याने मजेशीर उत्तर देऊन त्याला गप्प केले.
खरं तर, कपिल रणवीरला विचारतो, 'दीपिका कशी आहे?' यावर अर्चना म्हणते, 'विचार वहिनी कशी आहे?' यावर रणवीर म्हणतो, '10 वर्षांपासून मी याचं दीपू,दीपू पाहतोय, त्यामुळे जेव्हा कपिलचं लग्न झालं होतं, तेव्हा मी दीपिकाला सांगितले होते की,बेबी तू आणि मी कपिलच्या लग्नात एकत्र जाऊ.' रणवीरचे हे बोलणे ऐकून कपिल शर्माची बोलती बंद झाली.
याआधी शोचा आणखी एक प्रोमो समोर आला होता. ज्यामध्ये कृष्णा अभिषेक रणवीरच्या डान्सची खिल्ली उडवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सपना पार्लरची भूमिका करणारा कृष्णा रणवीर सिंगच्या डान्स स्टेप्सची खिल्ली उडवताना दिसेल. अभिनेता कृष्णाचा हा धमाल अभिनय पाहून त्याला हसू फुटलं.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. कोरोनामुळे दोन वेळा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून अखेर 12 मे ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच जयेशभाई जोरदार या सिनेमाच्या टीमला दिल्ली हायकोर्टाची पायरी चढावी लागली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनवर एका वकिलाने आक्षेप घेतला आहे.