Liger Movie Promotions Ananya Pandey : सोनी टीव्हीवर 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' (India's Laughter Champion) हा लोकप्रिय कॉमेडी शो नव्या ढंगात येतो आहे. यातून अनेक कॉमेडी दिग्गज सहभागी होताना दिसतील. यंदा या शोचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे कारण या शोचा आता लवकरच ग्रॅन्ड फिनाले (Grand Finale) संपन्न होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये सहभागी झालेल्या विनोदी कलाकारांपैकी एक विजेता होईल आणि ट्रॉफी घेऊन जाईल. शोमध्ये एकापेक्षा एक कॉमेडियन आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. 


या ग्रॅन्ड फिनालेला बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि साऊथचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) सहभागी होणार आहेत. अनन्या आणि विजय त्यांच्या आगामी 'लाइगर' (Liger) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले आहेत. 


या शोमध्ये एक वेगळीच गंमत या वेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इंडियाज लाफ्टर चॅम्पियन शोच्या ग्रँड फिनालेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये रिंकू भाभी अनन्यासाठी बॉयफ्रेंड शोधून आणाणर असल्याचे म्हणते. 


हे ऐकून खुद्द अनन्यालाही आश्चर्याचा धक्का बसतो. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रिंकू भाभी अनन्याला म्हणते की तुम इसे Boyfriend बना लो. प्रेक्षकात बसलेला एक मुलगा अनन्याला भटायला स्टेजवर येतो पण त्याची मस्करी करत अनन्याला रिंकू भाभी सांगते की याला तुझा बॉयफ्रेंड करून घे. 


या प्रकारामुळे सगळीकडे एकच हशा पसरतो.