Kapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपिल शर्मा म्हणतो, `माझी विचारसणी सॅलरी...`
Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशन (Kapil Sharma Interview) करताना दिसत आहे. सध्या त्याची एक मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे. आपल्या 300 कोटींच्या संपत्तीवर (Kapil Sharma Salary) नक्की काय म्हणाला कपिल शर्मा? जाणून घ्या.
Kapil Sharma Net Worth: गेली अनेक वर्षे 'द कपिल शर्मा शो' हा सुरू आहे आणि या शोमधून कॉमेडीयन कपिल शर्मानं (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांत करोडोंची संपत्ती उभी केली आहे. आजच्या मार्केटमध्ये कॉमडी शोंचीच चलती आहे. त्यामुळे सध्या असे कॉमेडी शो हे सर्वत्र लोकप्रिय होत आहेत. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही कॉमेडी शोजचीच चलती आहे. कपिल शर्मा हा सध्या भारतातला सर्वाधिक मानधन घेणारा विनोदी अभिनेता (Comedian Kapil Sharma) आहे. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माची नेटवर्थ ही 300 कोटी रूपये असल्याचे समोर आले असून त्यावर त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आहे. यावर उत्तर देताना त्यानं अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. (kapil sharma speaks on his 300 crore net worth read the full article to know what he says)
एका मोठ्या न्यूज चॅनलच्या मुलाखतीत त्यानं आपल्याला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. आपल्या 'झ्विगाटो' (Zwiggato) या चित्रपटाचे प्रमोशन करताना तो सध्या दिसतो आहे. त्यानिमित्तानं तो अनेक माध्यमांना मुलाखती देतो आहे, अशाच एका मुलाखतीत त्यानं आपल्याला 300 कोटींची संपत्ती असलेल्या प्रश्नावर (Kapil Sharma Interview) उत्तर दिले आहे. तो म्हणतो की, त्याला असा प्रश्न विचारण्यात येतो की, तुमची एकूण संपत्ती 300 कोटी रूपये आहे का? यावर उत्तर देताना तो हसतो आणि नंतर म्हणतो की, मी या सगळ्याचा विचार करत नाही. मी आत्तापर्यंत माझ्याकडून पुष्कळ पैसेही गमावले आहेत.
माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे कार आहे, माझं कुटुंब आहे आणि माझ्यासाठी तेच जास्त महत्त्वाचं आहे. मी काही कोणी साधू-महात्मा नाही. मी विचारसरणी ही सॅलरीसारखीच आहे. जर चांगला पैसा मिळत असेल तर तो कोणाला नकोय?'' असं उत्तर त्यानं दिले.
गुल पनाग आणि सयानी गुप्ता अशी स्टारकास्ट असलेल्या या 'झ्विगाटो' या चित्रपटात कपिल शर्मा एका फूड डिलिव्हरी बॉयची (Delivery Boy) भुमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नंदिता दास (Nandita Das) यांनी केले आहे. या त्याच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. वर म्हटल्याप्रमाणे कपिल हा सर्वाधिक मानधन घेणारा विनोदी अभिनेता आहे त्याचसोबत तो सर्वाधिक करही भरतो. एका एपिसोडसाठीही तो 50 लाखांपेक्षा कमी मानधन घेत नाही.
हेही वाचा - CID Producer Death: 'सीआयडी'चा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड, शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट व्हायरल
कपिल शर्माच्या शोचेही अनेकदा वाद झाले आहेत. यामधील अनेक कलाकार सोडून गेल्याच्याही बातम्या होत्या. त्यानंतर कपिल शर्माचा शोही परत नव्या ढंगात सुरू झाला आहे.