CID Producer Death: 'सीआयडी'चा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड, शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट व्हायरल

CID Producer Death: गेली वीसहून अधिक वर्ष सुरू असलेली मालिका सीआयडी... या लोकप्रिय मालिकेचे निर्माते यांचे नुकतेच (Pradeep Uppoor Death) निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊवरून एक भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे. 

Updated: Mar 15, 2023, 01:12 PM IST
CID Producer Death: 'सीआयडी'चा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड, शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट व्हायरल title=
CID procuder pradeep uppoor dies actor shivaji satam puts an emotional note on instagram

CID Producer Death: आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी (CID). ही मालिका आपल्या डोळ्यासमोर आली की 'कुछ तो गडबड हैं दया' (Kuch Toh Gadbad Hai) हा डायलॉग आठवत असेलच. एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांच्या तोंडातून बाहेर पडणारं हे वाक्य आपल्याला पाठही झालं असेलच. या मालिकेतली हरएक पात्र हे प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. परंतु ही जादू आपल्यापर्यंत पोहचवण्याचा विडा ज्यांनी उचलला त्या निर्मात्यांचे (CID Producer) नुकतेच निधन झाले आहे.

याची माहिती ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी इन्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक भावूक मेसेज आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही मालिका सूरू आहे. 

सीआयडी मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे सिंगापूर येथे निधन झाले आहे. त्यांचे निधन हे कर्करोगानं झाले असून त्यावर ते बराच काळ उपचारही घेत होते. अनेक मुलाखतींतून शिवाजी साटम यांनी आपल्यासोबतच्या प्रदीप उप्पर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. काल त्यांनी शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टनंतर (Shivaji Satam Instagram Post) चाहत्यांनीही प्रदीप उप्पर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सीआयडीसोबतच 'आहट', 'सतरंगी सुसराल', 'सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स' अशा काही लोकप्रिय मालिकांचीही निर्मिती केली होती. त्यांचा 'नेल पॉलिश' हा सिनेमा शेवटची निर्मिती असणारा ठरला. 

अनेक आठवणी 

त्यांच्या जाण्यानं सीआयडी मालिकेतील कलाकारांना शोक अनावर झाला आहे. शिवाजी साटम यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत 'कुछ तो गडबड हे दया' हा डायलॉग बोलताना हात हालवण्याची स्टाईल याबद्दल एक आठवण सांगितली होती. त्यात त्यांनी हा सीन त्यांच्या निर्मात्यांसोबत कसा क्रिएट केला होता अशी आठवण सांगितली होती. आपल्या या सीआयडी मालिकेमध्ये निर्माते (Shivaji Satam Interview) प्रदीप उप्पर किती पॅशिनेट होते याबद्दलही ते बोलले होते. शिवाजी साटम यांनी सीआयडी मालिकेतून 1 लाख रूपये (CID Actors Per Episode Fees) पर एपिसोड फी मिळायची अशी माहितीही त्यांनी दिली होती. 

हेही वाचा - Adani Enterprise Stock: अदानींचे शेअर्सचे आपटले... एकदोन नव्हे तब्बल 7 टक्क्यांची घसरण

गुन्हेगारी क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आणि त्यातही थोडंसा भावनिक एन्गल, मनोरंजन थोडंस हास्य या सगळ्यांची मिसळ करत ही मालिका त्यांनी अनेक वर्षे रंगवली होती ज्याचे संपुर्ण श्रेय हे कलाकारांना आणि टीमला जाते. सध्या या बातमीनं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जाते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिवाजी यांची पोस्ट व्हायरल

प्रदीप उप्पर यांचा एक फोटो शेअर करत शिवाजी साटम (Shivaji Satam Emotional Post) यांनी लिहिले आहे की, प्रदीप उप्पर, सीआयडीचा आधारस्तंभ आणि मालिकेचा निर्माता! नेहमी हसतमुख असणारा माझा प्रिय मित्र, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो… मनानेही खूप उदार. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठा चॅप्टर संपला गेलाय. मित्रा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी खूप आठवण येईल...अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.