मुंबई : 'द कपिल शर्मा शो' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये कपिल शर्मापासून ते कृष्णा अभिषेक, भारती सिंह, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. हे कलाकार प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. पण त्यासाठी विनोदवीर  गडगंज मानधन घेतात. जाणून घेवू कोणता विनोदवीर  किती मानधन घेतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


कपिल शर्मा 
आमच्या पार्टनर वेबसाइट बॉलीवूड लाइफनुसार, कपिल एका एपिसोडसाठी 30 ते 35 लाख रुपये घेतो पण आता 50 लाख रुपये घेतो.



कृष्णा अभिषेक



कृष्णा अभिषेक एका एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये घेतो.


अर्चना पूरण सिंग
अर्चना पूरण सिंग एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये मानधन घेते.


भारती सिंग
भारती सिंग ही प्रसिद्ध कॉमेडियन आहे. शोच्या एका एपिसोडसाठी ती 10 ते 12 लाख रुपये घेते.


किकू शारदा
किकू शारदा प्रत्येक एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेतो.


सुमोना चक्रवर्ती



सुमोना चक्रवर्ती 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडसाठी 6 ते 7 लाख रुपये घेते.