मुंबई : 'फिरंगी' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मात्र, पुनरागमन करत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.


व्हिडिओमुळे कपिल अडचणीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माने बाईक चालवत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. मात्र, या व्हिडिओमुळे कपिल अडचणीत सापडला आहे.


विद्यार्थी संघटनेची तक्रार


कपिल शर्माने शेअर केलेल्या व्हिडिओत तो अमृतसरच्या रस्त्यावर बुलेट राईड करताना दिसत आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, एका विद्यार्थी संघटनेने या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रसिद्ध वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे की, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केशव कोहली याने कपिल शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे.


...म्हणून केली तक्रार दाखल


केशव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कपिल शर्मा हा एक युथ आयकॉन आहे आणि रोल मॉडल असल्याने त्याने वाहतूक नियमांचं पालन करायला हवं. मात्र, कपिलने हेल्मेट परिधान न करताच बाईक चालवली आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल शर्मा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.