कपिल शर्माच्या नव्या शोचा पहिला एपिसोड ठरला फ्लॉप.. ट्विटर आल्या `अशा` रिअॅक्शन्स
सुनील ग्रोव्हर याच्यासोबत ऑस्ट्रेलियातून परतताना विमानात झालेले भांडण, त्यानंतर कपिल शर्माचे आजारपण, घसरलेला कार्यक्रमाचा टीआरपी यामुळे कपिल शर्माचा कॉमेडी शो टेलिव्हिजनवरून हटवण्यात आला होता.
मुंबई : सुनील ग्रोव्हर याच्यासोबत ऑस्ट्रेलियातून परतताना विमानात झालेले भांडण, त्यानंतर कपिल शर्माचे आजारपण, घसरलेला कार्यक्रमाचा टीआरपी यामुळे कपिल शर्माचा कॉमेडी शो टेलिव्हिजनवरून हटवण्यात आला होता. मात्र 25 मार्चपासून कपिल शर्मा पुन्हा 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा कार्यक्रम घेऊन आला आहे. या कार्यक्रमाच्या नव्या अंदाजाबाबात चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
कपिल शर्माच्या नव्या फॉर्मेटबद्दल प्रतिक्रिया
कपिल शर्माचा नवा कार्यक्रम ' फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा कार्यक्रम रविवार 25 मार्चपासून सुरू झाला. मात्र या कार्यक्रमाला त्याच्या पूर्वीच्या कार्यक्रमासारखी पसंती मिळालेली नाही. कपिलच्या चाहत्यांना या कार्यक्रमाकडून अपेक्षा होत्या मात्र त्याच्या फॅन्समध्येबाबत निराशा आहे. कपिलच्या नव्या कार्यक्रमाचा फॉर्मेट चाहत्यांना फारसा रूचलेला नाही.
कपिलच्या शोचं नवं फॉर्मेट
कपिल शर्मा यंदा त्याच्या नव्या कार्यक्रमामध्ये कॉमेडीसोबतच काही खेळदेखील घेऊन आला आहे. कपिलच्या शोमधील हे खेळ त्यामध्ये सहभागी होणारे सामान्य प्रेक्षक परिवारासोबत खेळणार आहेत. कपिल शर्माच्या चाहत्यांनी त्याला कार्यक्रमाचे जुने फॉर्मेट पुन्हा आणावे अशी मागणी केली आहे.
कपिल शर्माची टीम
'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या कार्यक्रमामध्ये चंदन प्रभाकर आणि किकू शारदा हे त्याचे जुने सहकारी आहेत. सोबतच मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे या कार्यक्रमाचा भाग झाली आहे. कपिल शर्माच्या चाहत्यांनी ट्विटरवर खुलेआम या कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सुनील ग्रोव्हरसोबत रंगलं कोल्ड वॉर
सुनील ग्रोव्हर बिग बॉसच्या 11 व्या पर्वाची विजेती शिल्पा शिंदेसोबत नवा कार्यक्रम घेऊन येणार आहे. Lil Frodo Productions निर्मित एक क्रिकेट कॉमेडी डिजिटल शो येणार आहे. यामध्ये शिल्पा शिंदेसोबत सुनील ग्रोव्हर झळकणार आहे. प्रीती सिमोन या कार्यक्रमाची निर्माती आहे.
कपिल शर्माच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सहाजिकच या कार्यक्रमामध्ये कोणाचा समावेश आहे ? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र कपिलकडून आमंत्रण आलेले नाही अशाप्रकारचे ट्विट पाहिल्यानंतर कपिल शर्माने अनेकदा फोन करूनही, माणसांना पाठवूनही तुझी भेट झाली नाही. विनाकारण अफवा पसरवू नका असे त्याने म्हटले आहे.