नवी दिल्ली : कपिल शर्माचे चाहते त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी कपिलच्या नव्या शोचा एक प्रोमो समोर आला. मात्र तेव्हा या शो चे नाव गुलदस्त्याच ठेवण्यात आले होते. आता या शो चे नाव समोर आले आहे. कपिल शर्माच्या नव्या शो चे नाव आहे फॅमेली टाईम विथ कपिल शर्मा. या शोचे पोस्टर समोर आले आहे. त्यात कपिल एकटाच दिसत असल्याने शो मध्ये कपिलसोबत कोण कोण असेल, हे स्पष्ट झालेले नाही.


कपिलचा नवा शो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कपिलचा तिसरा शो असेल. सर्वात आधी कपिल कलर्सवरील कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र सुपरहिट ठरलेला हा शो काही कारणास्तव बंद करण्यात आला. त्यानंतर द कपिल शर्मा शो मधून कपिल छोट्या पडद्यावर पुन्हा झळकला. तो ही शो गेल्या वर्षी बंद करण्यात आला. आता नवीन शो घेऊन कपिल रसिकांच्या भेटीला येत आहे. त्याचे पोस्टर आजच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.



कपिल शर्मा शो


ऑस्‍ट्रेलियातून परतत असताना फ्लाईटमध्ये झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोवरने कपिल शर्मा शो सोडून दिला. त्यानंतर अली अजगर, चंदन प्रभाकर आणि सुगंधा मिश्रा हे ही शो सोडून वेगळे झाले. द कपिल शर्मा शो च्या मुख्य कलाकारांनी शो सोडल्यानंतर शो ची टीआरपी सातत्याने पडला. त्यानंतर चॅनलने शो बंद केला.