मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा सिनेमा ‘फिरंगी’ची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण सेन्सॉर बोर्डाच्या भोंगळ कारभारावर नाराज होत निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. 


‘फिरंगी’चं प्रदर्शन थांबलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात विरोध झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘पद्मावती’चं १ डिसेंबरला होणारं प्रदर्शन थांबवलं आहे. भन्साळी यांच्या काही दिवसातच कपिल शर्मालाही सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. 


सेन्सॉर बोर्डाचा दणका....


सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगरा यांनी सांगितले की, ‘फिरंगी’ येत्या २४ नोव्हेंबरला रिलीज होणार नाहीये. आम्हाला अपेक्षा होती की, सेन्सॉर या आठवड्याच्या सुरूवातीला सिनेमाला सर्टिफिकेट देणार. पण आता हे सांगितले जात आहे की, सेन्सॉर सर्टिफिकेट २४ नोव्हेंबरला मिळणार. इतका कमी वेळ मिळाल्याने कपिल शर्मा आणि डिस्ट्रिब्यूटर अनिल थडानी यांनी निर्णय घेतला की, सिनेमा सध्या रिलीज केला जाऊ नये’.