शनिवारी संपन्न झाला कपिलच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा
पार्टीचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा दिले होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रिसेप्शन पार्टीत उपस्थित नव्हते.
मुंबई: विनोदी अभिनेता कपिल शर्मा १२ डिसेंबर रोजी विवाह बंधणात अडकला. प्रेयसी गिन्नी चतरथ सोबत पंजाब येथील जलंदर येथे विवाह संपन्न झाला. शनिवारी त्याने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये युवराज सिंह, सुरेश रैना, मीका सिंह, दलेर मेहंदी आणि सोहेल खान उपस्थित होते. शनिवारी आयोजीत करण्यात आलेल्या पार्टीचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा दिले होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रिसेप्शन पार्टीत उपस्थित नव्हते.
यावेळेस कपिलने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती तर गिन्नी निळ्या रंगाच्या अनारकलीत दिसली. कपिल शर्माने ट्विटरवर एक फोटो शेअर करत हा सोहळा थांबणार नसल्याचे सांगत तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे सांगितले.
गायक मीका सिंह याने सोहळ्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये कपिल आणि क्रिकेटर युवराज सिंग एकत्र बसलेले दिसत आहेत. गायिका हर्षदीप कौर सुद्धा कपिल आणि गिन्नीच्या रिसेप्शन सोहळ्यात उपस्थित होती. एका व्हिडिओमध्ये हर्षदीप कौर, कपिल आणि गायक दलेर मेहंदी हे 'मस्त कलंदर' गाणे गाताना दिसत आहेत.