करण आणि निशाचा बेडरूममधील तो व्हिडिओ व्हायरल
करण आणि निशा यांचं नातं आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे.
मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या करण मेहरा आता त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. हे नातं आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. काहीदिवसांपूर्वी निशाने करणविरोधात पोलिसांत तक्राक दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी करणला ताब्यात देखील घेतलं. त्यानंतर करण जामीनावर सुटला. करणची पत्नी निशा रावल यांनी त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
दोघांचं भांडण आता चव्हाट्यावर आलं आहे. दिवसागणिक त्यांच्यातले वाद वाढत असताना त्यांचा बेडरूममधील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. खुद्द निशाने व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये निशा बोलत आहे, पण तिला करण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देताना दिसत नाही. सध्या त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करणला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. या मालिकेच्या माध्यमातून त्याला लोकप्रियता देखील मिळाली. मालिकेत अभिनेत्री हिना खानने करणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मालिके शिवाय करण 'बिग बॉस', 'नच बलिये 5'मध्ये देखील दिसला होता. तर निशा टीव्ही शो 'शादी मुबारक'मध्ये दिसली होती.