मुंबई : छोट्या पडद्यावरची चर्चित जोडी करण पटेल आणि अंकिता भार्गव यांच्या विवाहाला आता तीन वर्ष झालीत. काही दिवसांपूर्वी अंकिता आई बनणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. करणनंही या बातमीला दुजोरा दिला होता. परंतु, ही सुंदर गोष्ट सत्यात येण्यापूर्वीच करण-अंकिताचं स्वप्न तुटलंय. या जोडप्याला आपलं पहिलंच बाळ गमवावं लागल्याची दु:खद घटना समोर येतेय. या जगात पाऊल ठेवण्यापूर्वीच करण - अंकिताच्या बाळानं या जगाचा निरोप घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये करण आणि अंकिता सहभागी झाले होते... याच कार्यक्रमादरम्यान त्यांना आपलं बाळ गमवावं लागलंय. काही मेडिकल समस्या निर्माण झाल्यामुळे अंकिताच्या बाळानं या जगात पाऊल ठेवलंच नाही. 


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अंकिताची तब्येत स्थिर आहे आणि तिला घरीच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. या दुर्दैवी प्रसंगी करणही तिच्यासोबतच आहे. 


करणनं टीव्हीवरील प्रसिद्ध 'मोहब्बते' या कार्यक्रमात मुख्य भूमिका निभावलीय. करण आणि अंकिताचं अरेन्ज मॅरेज आहे. अंकिताच्या वडिलांनी 'मोहब्बते' या कार्यक्रमात करणच्या सासऱ्याची भूमिका निभावलीय. टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या 'जज्बात' या कार्यक्रमातही दोघांनी आपल्या नात्यावर भाष्य केलं होतं.