`ही` हॉट तरुणी होणार सनी देओलची सून? केला मोठा खुलासा...
`पल पल दिल के पास` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही. नुकताच करण देओल एका मिस्ट्री गर्लसोबत दुबईमध्ये स्पॉट झाला आहे
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्टार किड्समधील अफेअरच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. आता या यादीत सनी देओलचा मुलगा करण देओलचंही नाव जोडलं गेलं आहे. खरंतर, करण देओल व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका मिस्ट्री गर्लसोबत दुबईमध्ये स्पॉट झाला आहे. मुलीची ओळख उघड झाली नसली तरी करण देओल तिला बऱ्याच दिवसांपासून डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही.
एका मुलाखतीत संवाद साधताना एका सूत्राने पुष्टी केली आहे की करण देओल त्या मिस्ट्री गर्लसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मुलीची ओळख सूत्राने सांगितली नाही, मात्र तो रिलेशनशिपमध्ये आहे. दोघंही एक-दोन वर्षांपासून एकत्र आहेत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे आहेत. देओल कुटुंब त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप खाजगी आहे. त्यामुळे त्यांना याबाबत काही सांगावंसं वाटण्याची शक्यता फारच कमी आहे. करण देओलसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल चित्रपटसृष्टीतील असल्याचंही सूत्राने स्पष्ट केलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बिमल रॉय यांची पणती द्रिशा हिला करण डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याची माहिती समोर आली होती.
द्रिशा आणि करण बालपणीपासूनचेच मित्र. द्रिशा आणि करणनं साखरपुडा केला की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पण, धर्मेंद्र यांची खालावलेली प्रकृती पाहता ही जोडी येत्या काळात लवकरात लवकर लग्नबंधनात अडकू शकते असं सांगण्यात येत आहे.
करण देओलची कारकीर्द काही खास राहिली नाही. त्याने 2013 साली 'यमला पगला दीवाना 2' मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2019 मध्ये सनी देओलने पल पल दिल के पास या चित्रपटातून मुलगा करणला लॉन्च केलं. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने स्वत: घेतली होती पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर 2021 मध्ये करण देओल 'वले' या चित्रपटात दिसला. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.
या चित्रपटात करण देओल दिसणार आहे
आता सनी देओलचा मुलगा करण देओल 'अपने 2' या चित्रपटात दिसणार आहे. यात करण व्यतिरिक्त सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचा मागील भाग अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता, ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आजकाल सनी देओल त्याच्या नवीन चित्रपट गदर 2 साठी प्रकाशझोतात आहे, जो 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.