Karan Johar Ans To Trollers : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) हॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय का घेतला त्याचा खुलासा केला होता. तिला चित्रपट दिले जात नव्हते तिला कॉर्नर करण्यात येत होते, असे तिनं एका मुलाखतीत सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) त्यासाठी दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) कारणीभूत ठरवलं होतं. त्यानंतर सतत करण जोहरचं नाव समोर येऊ लागलं होतं. तर काही दिवसांपूर्वी करणचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत करण जोहर अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) करिअर उद्ध्वस्त करण्याबद्दल बोलताना दिसला. या व्हिडीओनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत अनेक कलाकारांनी त्यावर टीका केली होती. त्यावर आता करण जोहरनं मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर जेव्हा आदित्य चोप्रा अनुष्काला 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात कास्ट करणार होता. त्यावेळी करणनं त्याला थांबवलं होतं. तू वेडा आहेस का तिला कास्ट करतोयस. त्यावेळी त्याला अनुष्का ऐवजी एका दुसऱ्या अभिनेत्रीला त्या चित्रपटात कास्ट करायचं होतं. पण आदित्यनं करणनं ऐकली नाही आणि त्यानं अनुष्काला कास्ट केलं होतं. त्यानंतर करणनं जेव्हा ‘बॅन्ड बाजा बारात’ पाहिला तेव्हा करणला त्याचं खूप वाईट वाटलं आणि त्यानं अनुष्काला त्याच्याच चित्रपटात कास्ट केलं. याविषयी करणनं 2016 साली राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 



करणनं आता सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणाचंही नाव न घेता सडेतोड उत्तर दिलं आहे. करणनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करण म्हणाला, 'लगा लो इल्जाम.... हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।'


हेही वाचा : 'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


दरम्यान, लवकरच करणचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं नाव रॉकी और रानी की प्रेम कहानी असे आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग दिसणार आहेत. या चित्रपटातून करण बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे.