Karan Johar `या` अभिनेत्रीवर करायचा `बेपनहा मोहोब्बत` पण...
Karan Johar Speaking on His First Love: करण जोहरचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया करण जोहरच्या (Karan Johar News) पहिल्या प्रेमाविषयी. सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीच्या तो प्रेमात पडला होता. त्यानंच स्वत:हून त्याबद्दल खुलासा केला होता. चला तर मग जाणून घेऊया की कोण होती ती अभिनेत्री?
Karan Johar Speaking on His First Love: अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहर कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. 2020 साली करण जोहर हा फक्त स्टार कीड्सना प्रमोट करतो, त्यांनाच लॉन्च करतो. अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. नेपोटिझम हा शब्द करण जोहरच्या नावाच्या मागेपुढे फिरत होता. अभिनेत्री कंगना राणावतनं नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरला होता. परंतु आता करण जोहरही आपल्या आयुष्यात पुढे गेलेला आहे आणि यशस्वी चित्रपटांची घोडदौड करतो आहे. आजचं आपल्या वाढदिवसानिमित्तानं त्यानं आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा त्याचा आगामी चित्रपट येत्या 28 जूलैला प्रदर्शित होणार आहे. त्याचसोबत बॉलिवूडमधील त्याच्या यशस्वी कारकीर्दीलाही 25 वर्षे पुर्ण होतील. दिग्दर्शक करण जोहरच्या रिलेशनशिपविषयीही अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. परंतु आता तो दोन मुलांचा बापही आहे. प्रत्येकाचेच पहिले प्रेम असते. त्यातून आपलं पहिलं प्रेम हे कधीच विसरलं जात नाही. करण जोहरच्याही बाबतीत ते होतं. या इंडस्ट्रीत आल्यावर बॉलिवूडच्या 'त्या' लोकप्रिय अभिनेत्रीवर करण जोहरचं प्रेम (Karan Johar First Love) बसलं होतं. या अभिनेत्रीला त्यानं प्रपोजही केलं होते. तुम्हालाही जाणून घेऊन कदाचित आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे.
तुम्हालाही त्या अभिनेत्री विषयी जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली असेलच. आज करण जोहरचा 51 वा वाढदिवस आहे. मागील वर्षी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा (Karan Johar Birthday) झाला होता. या त्याच्या पन्नासाव्या बर्थडे सेलिब्रेशनला अख्खं बॉलिवूड तारांगण हजर होतं. करण जोहरचा जन्म 25 मे 1972 रोजी मुंबई येथे झाला. करण जोहर हा प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते यश जोहर यांचा मुलगा आहे.
हेही वाचा - 'दंगल' फेम अभिनेत्रीबरोबर Delhi Metro मध्ये घडली धक्कादायक घटना, सांगितला 'तो' भयावह अनुभव
'ही' अभिनेत्री होती करणचं पहिलं प्रेम!
पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते करण जोहरच्या पहिल्या प्रेमाविषयी. या अभिनेत्रीचे नावं होते ट्विकंल खन्ना. हो. हीच ट्विकंल खन्ना, सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिपंल कपाडियाची मुलगी आणि अक्षय कुमारची पत्नी. ट्विकंल आणि करण जोहर हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. ते पंचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिकत होते. त्यावेळी करण ट्विंकल खन्नावर बेपन्ना मोहोब्बतं करत होता. याचा खुलासा खुद्द करण जोहरनच केला होता. ट्विकंल खन्नाचे पुस्तक मिसेज फनीबोंसच्या लॉन्चवेळी (Twinkle Khanna) करणनं याचा खुलासा केला होता.
काय म्हणाला करण?
करण जोहर म्हणाला होता की, ''मला आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम जडलं आहे आणि ते म्हणजे ट्विकंल खन्नावर. यावर ट्विकंलनंही आपलं मतं प्रदर्शित केले होते.'' ती म्हणाली होती की, ''करण माझ्यावर प्रेम करायला. त्यावेळी मला अप्परलिप्स होते. त्यावरही तो फिदा झाला होता.''
करणचं हे प्रेम एकतर्फी होते. ट्विकंल मात्र त्याच्यावर प्रेम करत नव्हती. करणनं आपला पहिला चित्रपट 'कुछ कुछ होता हैं' (Kuch Kuch Hota Hai) मधल्या टीनाचा रोल हा ट्विकंलच्या हिशोबानं लिहिला होता. परंतु ट्विकंलनं हा रोल नाकारला होता. ज्याचं करणलाही वाईट वाटले होते.