`मूड खराब केला`, करण जोहरचे कपडे बघून सगळेच असे का म्हणतायत?
करण जोहर आपल्या सिनेमासोबतच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतो.
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्माता करण जोहर आपल्या फॅशनमुळे कायमच चर्चेत असतो. वेगवेगळ्या डिझाइनर कपड्यांमध्ये करण जोहर आपले फोटो शेअर करत असतो. मात्र अनेकदा करण जोहरल्या आपल्या कपड्यांमुळे त्याला ट्रोलिंगला सामोर जावं लागलं आहे. असेच करणचे काही फोटो व्हायरल होत आहे.
फॅशन स्टाईलमुळे करण झाला ट्रोल
करण जोहरने काही वेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. त्याने शाल घातली असून तो कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. करण जोहरचे हे फोटो राजस्थानमधील आहेत. हे फोटो पाहून अगदी स्पष्ट होत आहे. काही लोकांना करण जोहरची ही फॅशनेबल स्टाइल आवडली नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
युझर्सने देखील उडवली खिल्ली
फोटोवर कमेंट करताना एका युझरने म्हटले आहे की, सगळा मूड खराब केला आहे. तर दुसऱ्याने म्हटलंय की, या गरिबाला कुणीतरी चांगला स्वेटर देऊन हेल्प करा. ही कोणती फॅशन आहे? तर एकाने विचारलं रणवीरच भूत आलं की काय?
5 दिवसांनंतर दिग्दर्शनात परतला करण जोहर
करण जोहरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या नवीन चित्रपट 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वत: करत आहेत. यात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.
याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. यापूर्वी, करण जोहरने 2016 मध्ये 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.