मुंबई : नुकताच दिग्दर्शक करण जोहरने आपला वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करणला शुभेच्छा दिल्या. करणने त्याच्या ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या फार जवळच्या व्यक्तीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध डिझायनर प्रबळ गुरूंगने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून करणला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर दोघांचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करण आणि प्रबळ जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. प्रबळने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'प्यार किया तो डरना क्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करण..' असे लिहिले आहे. त्याच्या पोस्टवर करणने प्रतिक्रिया दिली आहे. 'भावा थोडा स्वत:वर आवर घाल' अशी कमेंट त्याने केली आहे. 


त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या अशा कमेंटनंतर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करण सध्या त्याच्या 'तख्त' चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे.