`अनेकवर्ष एकतर्फी प्रेम, पण...` लव्ह लाईफबद्दल करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा
Karan Johar on One Side Love: बॉलिवूड म्हटलं की लव्ह आणि रिलेशनशिपचा मामला आलाच. जितकं ग्लॅमर तितकंच सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफमध्येही चाहत्यांना कंचित नाही तर भरपूर इच्छा असते. सध्या करण जोहर या बाबतीतला हॉट टॉपिक बनलेला आहे.
Karan Johar on One Side Love: करण जोहरची अनेकदा चर्चा रंगलेली असते त्यामुळे सोशल मीडियावर तो कायमच ट्रेडिंग असतो. त्याच्या रिलेशनशिपबद्दलही अनेकदा चर्चा रंगलेली असते. करण जोहर हा सध्याही सिंगल आहे. त्यामुळे त्याच्या रिलेशनशिपबद्दल त्याला अनेकदा प्रश्न हे विचारले जातात. त्यावर तो मोकळेपणानं आणि थेट उत्तरही देताना दिसतो. सध्या त्यानं अशाच एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा रंगलेली असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या लव्ह आणि रिलेशनशिप्सची. आता रिलेशनशिप्स फारच बदलत चालले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप, डेटिंग अॅप्स, कॅज्युअल रिलेशनशिप, सेक्शुल रिलेशनशिप असे विविध प्रकार त्यात पाहायला मिळतील. त्यातून आता रिलेशनशिपची व्याख्याही बदलते आहे आणि प्रत्येकासाठी ती फारच वेगवेगळी आहे. अशावेळी चर्चा असते ती म्हणजे कोण आपल्या रिलेशनशिपमध्ये फसलं आणि कोण यशस्वी झालं.
परंतु करण जोहरनं यावेळी फार इंटरेस्टिंग अशी त्याची प्रेम कहाणी सांगितली आहे. आपल्या लव्ह लाईफबद्दल सहजा कोणी बोलत नाही परंतु त्यातूनही यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यानं सांगितलेल्या त्याच्या एकतर्फी प्रेमाची. एका मुलाखतीतून त्यानं सांगितले की तो आजही का सिंगल आहे त्याच्यमते, एकतर्फी प्रेम अनेक वर्ष केल्यानंतर त्याला त्या प्रेमात धोका मिळाला आणि मग त्याला कळलं की खरं प्रेम हे सोप्पं नाही त्यातून मग त्यानं 'ए दिल हैं मुश्किल' हा चित्रपट तयार केला. यावेळी त्यानं डिझायनर प्रबल गुरंग याच्याशी बोलताना याचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी प्रबल गुरंग याच्यासोबत त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांचीही बरीच चर्चा रंगलेली होती.
हेही वाचा : VIDEO: वर्षा उसगावकरांचं गोव्यातलं आलिशान घर पाहिलंत? नेटकरी विचारतात, 'आम्हाला कधी नेणार घरी'
यावेळी करण जोहर म्हणाला की, आत्तापर्यंत तो का सिंगल होता याबद्दल त्याने खुलासा केला आहे तो म्हणाला की, ''30 व्या वर्षीपर्यंत हे समजून गेले होते की योग्य जोडीदार निवडणं हे फारच कठीण आहे. त्यातून रिलेशनशिपमध्ये राहणंही फार कठीण आहे.'' त्यापुढे तो म्हणाला की, त्याला त्याच्या तरूणपणात एकतर्फी प्रेमाचाही अनुभव आला होता. हे प्रेम अनेक वर्षे राहिले होते. परंतु नंतर त्याला या प्रेमात धोका मिळाला ज्यानं त्याला खऱ्या प्रेमात अर्थ समजावून दिला होता. त्यावेळी त्याला हेही कळलं की खऱ्या प्रेमाची ताकद काय असते.
यापुढे तो असंही म्हणाला की प्रेम काही माझा वीक पोईंट नाही. त्यातून मला खूप ताकद मिळाली आहे. मला खूप हिम्मत मिळाली. सोबत प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्याला खूप शिकायलाही मिळाले होते. याचा त्याच्या एकतर्फी प्रेमावर त्यानं 'ए दिल हैं मुश्किल' हा चित्रपट तयार केला होता. आता त्याला प्रत्येक क्षणी प्रेम मिळते म्हणून तो खूप आनंदी आहे. सोबतच आपल्या मुलांसोबत तो अधिक वेळ घालवतो आणि पालकांसोबतही असतो.