मुंबई : अमेरिकेच्या 'स्कोर ट्रेन्डस इंडिया' या कंपनीने नुकतीच लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित कलाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या दिग्दर्शकांची, कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांत लोकप्रियतेमध्ये सर्वात अव्वल ठरले आहेत. लोकप्रियतेच्या या चार्टवर अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन दुसऱ्या क्रमांकावर तर बाहुबली फेम प्रभास तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत दिग्दर्शक करण जोहर पहिल्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. 'स्कोर ट्रेन्डस इंडिया'च्या आकड्यांनुसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लॅटफार्म आणि वेबसाईट्स या लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण १०० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यातील या यादीनुसार २.० चे दिग्दर्शक शंकर पानीकर दुसऱ्या स्थानी आहेत. फरहान अख्तर तिसऱ्या क्रमांकावर तर रोहीत शेट्टी चौथ्या क्रमांकावर आहे.



'स्कोर ट्रेन्डस इंडिया'चे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी 'करण जोहर एक ब्रॅंड आहे. करण जौहर केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर तो सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे त्याला अनेकांची पसंती मिळते. करणचे डूडल असो किंवा एयरपोर्ट लुक्स, त्यामुळे तो जवळपास दररोजच चर्चेत असतो.' असं त्यांनी म्हटलंय.