Moving In With Malaika: अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्री  ‘मूविंग इन विद मलायका (Moving In With Malaika)’ या ओटीटी शोमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमी शोचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत अनेकांनी मलायकाच्या शोमध्ये हजेरी लावली. आता मलायकाच्या शोमध्ये दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) दिसणार आहे.  शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठे खुलासे करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका तिच्या खास अंदाजात करणचं शोमध्ये स्वागत करतो. त्यानंतर करण सोफ्यावर बसतो आणि मलायकाला विचारतो तुला कसं वाटतं जेव्हा तुला लोक तुझ्या शरीराबद्दल विचारतात? यावर मलायका म्हणते, 'तु खरंच यावर सिरियस आहे...' (malaika arora age)


पुढे करण मलायका विचारतो, 'सध्या तुझ्या प्रेमात कोण आहे आणि तू लग्न कधी करणार आहेस?' या प्रश्नाचं उत्तर आपल्या अंदाजात देताना मलायका म्हणते, 'करण हा माझा सोफा आहे तुझा नाही....' सध्या दोघांच्या व्हिडीओ अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. (malaika arora husband)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका प्रेग्नेंसीमुळे (malaika arora son) चर्चेत आली होती. मलायकाच्या रंगणाऱ्या चर्चा पाहून अभिनेता अर्जुन कपूरने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. अर्जुन म्हणाला, 'मी कायम असे फेक आर्टिकलकडे दुर्लक्ष करतो. जे जर्नलिस्ट अशा खोट्या बातम्या छापतात ते अयोग्य आहे...' (malaika arora and arjun kapoor married)


पुढे अभिनेता म्हणाला, 'आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिम्मत करू नका.' सांगायचं झालं तर मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोघांनी सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. (malaika arora movies)